झेन-जीने सरकारला गुडघ्यावर आणलं, संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचं घणाघाती भाषण

Foto
छत्रपती संभाजीनगर :  झेन-जी मुलाने सरकारला गुडघ्यावर आणलं, अभिजीत दिपके संभाजीनगरचा आहे, पहिल्या दिवशीपासून आपण त्याला पाठिंबा दिला. विस्तवासारखी ही तरुणाई असते, तुम्ही ठरवा हे मी करणारच, देवेंद्र फडणवीस यांना सांगणार आहात का? पुढची सत्ता तुम्ही बघणार नाही. उद्यापासून पंचनामे तयारी करा, हे सटेलाईटमधून पंचनामे करणार आहेत, आता सॅटेलाईटमधून कळणार का भुईमुगाच्या शेंगा खालून लागतात की वरून? पाच तारखे नंतर मी स्वतः तुमच्यासोबत बांधावर येणार असल्याचेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर दौरा केला. यावेळी, राज्यातील राजकीय परिस्थिती, गंभीर प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणींसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच, एक काळ असा होता पंतप्रधान मराठवाड्याचा होईल असं चित्र होतं. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंढे गेले, जे सत्तेचा उपभोग सुद्धा घेऊ शकले नाहीत, गोपीनाथ मुंडेंचा रहस्यमय मृत्यू झाला, त्यांनी मराठवड्यात प्रश्न मांडले, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूबाबात शंका उपस्थित केली आहे. 

फुटलेल्या खासदाराने निष्ठा विकल्या, मराठवाड्याचे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही रस्त्यावर उतरा, मोदी-फडणवीस सरकारविरोधात मोर्चा काढा,असे आवाहन उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातील शिवसैनिकांना केले. 5 ऑक्टोबर नंतर मी आदित्य दौऱ्यावर आहोत, आपले नेते आहेत. आम्ही बघणार, पंचनामे बरोबर होतात की नाही ते बघणार. पंचनामा बरोबर होतोय की नाही ते, नुकसान भरुन देण्याची जबाबदारी आपली आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.  

बरेच मुस्लिम आमच्यासोबत आले, कारण त्यांना कळलं. आमचा मुस्लिम महापौर आहे, त्यावर टीका केली. सध्या प्राण पणाला लावून जरांगे पाटील आंदोलन करतोय आणि उपमुख्यमंत्री फॉरेनला जाऊन पुरस्कार घेतोय, असे म्हणत एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंनी टीका केली. तमाम जातीपातीला आवाहन करतो की, आपण एकजुटीने एकत्र येऊ... कारण सत्ताधारी एकमेकांना लढवत आहेत, मराठा-ओबीसी करत आहेत. आपण एकजुटीने एकत्र येऊ मगचं सगळे प्रश्न सुटतील. जरांगे पाटील आपले आहेत, सगळे आपले आहेत, आपण सगळे एकत्र येऊ, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सर्वच नागरिकांना आवाहन केलंय.

दक्षिणेत जाऊन हे बहुभाषिक राज्य बोलून दाखवा
अमित शाह म्हणतात महाराष्ट्र बहूभाषिक राज्य आहे, हे गुजरात, कर्नाटक आणि दक्षिण भारतात जाऊन बोलू शकतात का? इथं बोलू शकतात कारण बाजूला हे गद्दार, लंपट बसले होते. हा अमित शाह छातीठोकपणे बोलतो आणि तुम्ही ऐकता आणि हे बाळासाहेब यांचे विचार म्हणतात, असे म्हणत एकनाथ शिंदेंना पुन्हा लक्ष्य केलं. एक काळ असा होता की, पंतप्रधान मराठवाड्याचा होईल असं चित्र होत. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे गेले, जे सत्तेचा उपभोग देखील घेऊ शकले नाहीत. मुंडेंचा रहस्यमय मृत्यू झाला, त्यांनी मराठवाड्यात प्रश्न मांडले, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूबाबत जाहीरपणे शंका उपस्थित केली.

गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू रहस्यमय - ठाकरे
त्यावेळी, प्रमोद महाजन आपलाला उद्याचे पंतप्रधान वाटायचे. एक काळ असा होता की, हा मराठवाडा देशाला पंतप्रधान देऊ शकेल असा नेता त्यांनी तयार केला होता. प्रमोदजी अनपेक्षितपणे आपल्यातून गेले, गोपीनाथ मुंडे. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंनी भाजपची पाळंमुळं महाराष्ट्रात रुजवली ते आज दोघेही राहिले नाहीत. गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचं रहस्य अजूनही उलगडलं नाही. मला वाईट काय वाटतं, जो भाजपची पाळंमूळं घेऊन लढला, तो सत्तेचा उपभोग घेऊ शकला नाही. सत्ता घेऊन तो मराठवाडा आणि देशाला काही देऊ शकला नाही हे शल्य माझ्या मनात आहे. गोपीनाथ मुंडेंबद्दल मला एवढं वाईट वाटतं की, एक दिवससुद्धा ते मंत्री म्हणून लोकसभेच्या सभागृहात जाऊ शकले नाहीत. काल रात्री बोलतात काय, आज सकाळी बातमी काय येते, रहस्यमय मृत्यू... असे म्हणत उद्धव ठाकरेंनी गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली.